। मुंबई । प्रतिनिधी ।
केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे एका कार्यक्रमात भाषण सुरु असताना भोवळ आली. त्यामुळे ते व्यासपीठावरील खुर्चीवर जाऊन बसले. त्यानंतर गडकरी यांना तातडीने व्यासपीठावरून खाली नेण्यात आले.
नजीकच्या रुग्णालयातील डॉक्टरांना याठिकाणी पाचारण करुन प्राथमिक उपचार करण्यात आले. शरीरातील साखरेची पातळी कमी झाल्यामुळे गडकरी यांची प्रकृती खालावली असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. सध्या नितीन गडकरी यांची प्रकृती ठीक असल्याचं डॉक्टरांनी सांगितले.