हवामान बदलामुळे रायगडातील वाहनांवर पांढरी चादर

| अलिबाग | भारत रांजणकर |
हवामानातील बदलांमुळे अलिबाग सह संपूर्ण रायगड जिल्ह्यात तसेच कोकण आणि महाराष्ट्र भर रविवारी सकाळी एक अनपेक्षित प्रकार पाहायला मिळाला. जिल्ह्यातील अनेक वाहनांवर सकाळच्या वेळेत पांढर्‍या रंगाची पावडर पसरल्याचे दिसत होते. हा थर नेमका कसला असावा, असा प्रश्‍न सुरुवातीला नागरिकांना पडला होता. मात्र, गुजरात आणि राजस्थानच्या दिशेने येत असलेल्या धुळीच्या वादळामुळे हवामानात हे बदल होत असल्याची माहिती समोर आली आहे.


पाकिस्तानमधील धुळीच्या वादळाचा कोकणातील वातावरणावर परिणाम राजस्थान आणि गुजरात दिशेने सरकत आहे. पाकिस्तानच्या कराचीत नुकतेच धुळीचे वादळ आले होते. हे वादळ आता राजस्थान आणि गुजरात दिशेने सरकत आहे. त्यामुळेच वातावरणात सकाळपासून मळभ आणि धूळ दिसून येत आहे. रायगड आणि संपूर्ण कोकणात गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झालेले पाहायला मिळत आहेत. सकाळपासून दृश्यमानता अतिशय कमी, हवेमध्ये धुळीचे कण मिसळल्याने त्यात पाऊस पडल्याने अनेक गाड्यांवर सफेद डाग दिसून येत आहेत. अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, या धुळीच हवेचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे असून सरकारने मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

Exit mobile version