महार्गावरील गतिरोधकांना मारले पांढरे पट्टे

कोलाड पोलिसांचा पुढाकार
| कोलाड | वार्ताहर |

मुंबई-गोवा महामार्गावर ठीक ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. तर, अनेक ठिकाणी गतिरोधकांवरील पांढरे पट्टेच गायब असल्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी कोलाड पोलीस अधिकारी सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी कोलाड नाका ते भिरा फाटा म्हैसदरा पूल या ठिकाणी गतिरोधकांना पांढरे पट्टे मारुन घेतले आहेत.

महामार्ग हा कायमच रहदारीचा असून, या महामार्गावर रोजच वाहनांची वर्दळ असते. या वर्दळीच्या मार्गावर निकृष्ट बनवलेल्या रस्त्यामुळे कोलाड ते खांब हद्दीत रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यातच गतिरोधकांवरील पांढरे पट्टेच गायब असल्यामुळे दिवसा व रात्रीच्या अंधारात या महामार्गावरील गतिरोधक दिसत नसल्याने गंभीर तसेच किरकोळ अपघात होत असतात. होणारे अपघात टाळण्यासाठी कोलाड पोलीस अधिकारी सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी कोलाड नाका ते भिरा फाटा म्हैसदरा पूल या ठिकाणी गतिरोधकाला पांढरे पट्टे मारले आहेत. त्यामुळे प्रवासी वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे.

Exit mobile version