कोण होणार राष्ट्रपती? द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा; मतमोजणीला सुरुवात

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
आज देशाला नवे राष्ट्रपती मिळणार असून बहुमताच्या जोरावर द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्‍चित मानला जात आहे. दरम्यानच्या काळात विरोधी पक्षांकडून उमेदवारी देण्यात आलेले यशवंत सिन्हा यांनी लोकशाही व्यवस्था वाचवण्यासाठी मतदान करण्यासंदर्भात आवाहन देखील केलं होतं. त्यामुळे आता नेमकी मतमोजणी झाल्यानंतर निकाल काय लागणार? याकडे लक्ष लागलं आहे.

एनडीएकडून द्रौपदी मुर्मू तर विरोधकांकडून यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उमेदवारी भारताच्या राष्ट्रपती पदासाठी सोमवारी झालेल्या मतदानानंतर आज त्याची मतमोजणी करण्यात येणार आहे. अवघ्या देशाचं लक्ष या मतमोजणीकडे लागलं आहे.

Exit mobile version