2 फेब्रुवारीला होणार फैसला
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
शिवसेना कुणाची, उद्धव ठाकरेंची की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची? मूळ शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह कुणाला देणार याची उत्तरं 2 फेब्रुवारीला मिळण्याची शक्यता आहे. सर्वोच्चच न्यायालयात याबाबत महत्त्वाची सुनावणी होणार आहे. न्यायालय काय निर्णय देतं याकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
शिवसेना ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाने दिलेल्या शिवसेना पक्षाबाबतच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. याच याचिकेवर 2 फेब्रुवारीला महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगाने 17 फेब्रुवारी 2023 रोजी एक अंतिम निकाल शिवसेनेच्या वादावर दिला होता. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे गटाला दिले गेले होते. आयोगाच्या याच निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.







