विधवा प्रथा बंद करण्यात यावी

अखिल बुरुड समाजाचे ठराव

| नेरळ | वार्ताहर |

अखिल बुरुड समाज यांच्याकडून विधवा महिला यांच्याबद्दल महत्वाचा असा विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव एकमंताने मंजूर केला आहे. कर्जत येथे अखिल बुरुड समाजाची शिबिरात हा ठराव घेण्यात आला असून या ठरावाची सर्वांनी अंमलबजावणी करावी अशी मागणी संस्थेचे आबासाहेब पवार यांनी केली आहे.

अखिल बुरुड समाज प्रतिष्ठान सेवाभावी संस्थेचे कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर कर्जत जवळील सदानंद रिसॉर्ट येथे घेण्यात आले. मुंबई सह ठाणे जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि रायगड जिल्ह्यातील कार्यकर्ते या शिबिरात सहभागी झाले होते. या कार्यकर्ता शिबिरात एक महत्वाचा प्रस्ताव मांडण्यात आला कि विधवा प्रथा बंद करण्यात यावी यावर मार्गदर्शन केले गेले. रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यात सर्व प्रथम बंद करण्यात आली आले व त्याची अंमलबजावणी देखील सुरु आहे. महाराष्ट्र शासनाने काढलेल्या अधिसूचना यांचा आदर करीत अखिल बुरुड समाज प्रतिष्ठान यांनी जाहीर केला आहे त्या अनुषगाने विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव ठेवण्यात आला व तो एक मतांनी मंजूर झाला. दिपाली दिलीप मोरे खोपोली तसेच महासचिव प्रकाश माने अखिल बुरुड या ठरावाबद्दल काही सूचना केल्या. यावेळी मार्गदर्शन शिबिर, विधवा प्रथा बंद करणे, अखिल बुरुड समाज प्रतिष्ठान 2024 दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले.

या शिबिराला सदानंद गायकवाड, गजानन नागे, निलेश नागे, प्रशांत करमत, गणेश वडतीले, उमाजी माडेकर, उल्का माडेकर, ज्योती माने, अनिता पवार, स्नेहल नागे, रेश्मा सोंडकर, सुनिता सावंत, श्रुती वाडेकर, शिवाजी कोरडे, अंकिता मोरे, दीपक गायकवाड, तुषार सोंडकर, सूर्यकांत सोंडकर, संदीप नागे, राजू सुरवसे, विकास सावंत, गणेश मोरे, दिलीप मोरे, संदीप जामकर, राकेश किल्लेकर, किशोर गायकवाड, आदींसह प्रतिष्ठान चे पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version