पत्नी-मुलगी बेपत्ता

| पनवेल | प्रतिनिधी |

घरातून कोणाला काहीही न सांगता निघून गेलेली पत्नी आणि मुलगी ही घरी परत न आल्याने ते हरवले असल्याची तक्रार अरुबबुल मॉडल यांनी पनवेल तालुका पोलिस ठाण्यात केली आहे. कोन गाव येथे राहणारी एस्मोतारा अरुबबुल मोंडल (25) आणि मुलगी रायमा खातून (6) हिला घेऊन घरातून कोणाला काहीही न सांगता निघून गेली. या दोघींबाबत कोणाला काही माहिती असल्यास तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार संजय दोरगे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

Exit mobile version