| पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुक्यातील कोळवाडी येथून एक 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी शाळेत जाते असे सांगून घरातून निघून गेली. मात्र, ती घरी परत न आल्याने अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी तिचे कायदेशीर रखवालीतुन त्याचे संमतीशिवाय फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. राधा साकेत असे या तरुणीचे नाव असून, तिचा वर्ण गोरा, उंची 5 फुट, डोळे काळे, केस काळे मध्यम, नाक सरळ, चेहरा उभट, असून तिने अंगात हिरव्या रंगाचा कुर्ता घातला आहे. तिच्या बद्दल कोणाला काही माहिती असल्यास पनवेल तालुका पोलीस ठाणे किंवा पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब फड यांच्याशी संपर्क साधावा.







