आंबेवाडी गावातील डोंगराला वणवा

जिवसृष्टी लोप पावण्याच्या मार्गावर

| कोलाड | प्रतिनिधी |

रोहा तालुक्यातील आंबेवाडी गावातील डोंगराला मंगळवारी (दि.31) सायंकाळी 7.00 वाजण्याच्या सुमारास वणवा लावण्यात आला. या वणव्यामुळे संपूर्ण डोंगर होरपळून निघाला आहे. त्यामुळे हळूहळू येथील जिवसृष्टी नष्ट होत असुन त्यामध्ये असंख्य पशुपक्षी होरपळून निघत आहेत. परिस्थिती अशीच कायम राहिली तर जिवसृष्टी पुर्णतहः लोप पावेल. त्यामुळे याला जबाबदार कोण, अशी संतप्त प्रतिक्रिया निसर्गप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस वणवे लावण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. वणवे लावणाऱ्यांवर कोणाचाही अंकुश नसल्याने व कायद्याचा धोका नसल्याने त्यांचे फावत आहे. शिकार करणे, वृक्षतोड करणे वनसंपदा मिळवणे, तसेच सरपणासाठी लागणारा लाकूड फाटा या करिता हे वणवे लावले जात आहेत. त्यामुळे वनसंपदेची हानी होत आहे. परंतु, याकडे वनखाते दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे. माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी अनादिकालापासून वृक्षाची अक्षरशः कत्तलच चालविली आहे. सद्याच्या आधुनिकेतेच्या व तंत्रज्ञानाच्या युगात औद्योगिकरण व नागरिकरणाच्या नावाखाली जंगलच्या जंगले भुईसपात होतांना दिसत आहे. त्यामुळे अगोदरच पर्यावरणाचे संतुलन पार बिघडले आहे. त्यामध्ये भर म्हणून ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या वणव्यामुळे अधिकच भर पडत आहे. तर, वनसंपदेबरोबर प्राण्यांच्या वास्तव्यावर गदा देखील येतांना दिसत आहे.

Exit mobile version