वन्यप्राण्यांची अन्न पाण्यासाठी तळमळ

। सुतारवाडी । वार्ताहर ।
सध्या उन्हाळा सर्वत्र प्रकर्षाने जाणवायला सुरुवात झाली असून वन्य प्राणी पिण्याच्या पाण्यासाठी धडपड करत असताना दिसत आहेत. विशेषतः डोंगर माथ्यावरील अन्य प्राण्यांसह माकडे सुद्धा अन्नाच्या व पाण्याच्या शोधार्थ रस्त्यावर येत आहेत. ताम्हाणी घाटामधील वन्यप्राणी आता रस्त्यावर आले असून विशेषतः माकडांना प्रवाशांनी टाकलेल्या वस्तू हस्तगत करण्यात मोठी कसरत करावी लागत आहे. रोहा, माणगाव, श्रीवर्धन, महाड तसेच अन्य शहरांतील पर्यटक विळेमार्गे पुण्याकडे जात असताना त्यांना ताम्हाणी घाटावरील डोंगरावरुन माकडांचा मोठा परिवार रस्त्यावर येतो. प्रवाशी त्यांना खाद्य पदार्थ टाकतात परंतु त्या ठिकाणी त्यांना पिण्याच्या पाण्याची मोठी आवश्यकता असल्याने माकडांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

Exit mobile version