उरणमध्ये वन्यजीव सप्ताह साजरा

। उरण । प्रतिनिधी ।

पृथ्वीवर प्रचंड जैव विविधता आहे. परंतु जंगलतोड, वाढते शहरीकरण, पशु पक्षांच्या अधिवासांवर मानवी आक्रमण यासारख्या बाबींमुळे निसर्गातील अनेक पशुपक्ष्यांच्या जाती नष्ट होत चालल्या आहेत. आणि यामुळे बिघडत चाललेला निसर्गाचा समतोल ही परिस्थिती बदलण्यासाठी भारतात 1952 सालापासून वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. राजू मुंबईकर यांच्या माध्यामातून आणि कर्नाळा पक्षीअभयारण्य व उरण उरण वनपरिक्षेत्र वनविभाग यांच्या आयोजनातून दि. 2 ते 7 ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. या अनुषंगाने राजू मुंबईकर यांच्या व्याख्यानरुपी प्रबोधनात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून सतत सात दिवस आपटे प्राथमिक शाळा, पोसरी प्राथमिक शाळा, पी.पी. मुंबईकर इंग्लिश मीडियम स्कूल, रानसई प्राथमिक शाळा, पी.पी. खारपाटील हायस्कूल चिरनेर, कल्ले प्राथमिक शाळा या सात शाळांतील विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या प्राणी, पक्षी आणि वन्य जीवांबद्दलची उपायुक्त अशी माहिती देत आपल्या व्याख्यानरुपी प्रबोधनात्मक कार्यक्रमातून जनजागृती केली.

Exit mobile version