वन्यजीव सप्ताहानिमित्त चित्रकला स्पर्धा

| मुरूड-जंजिरा | वार्ताहर |

वनविभाग उपवनसंरक्षक वन्यजीव ठाणे आयोजित वनपरिक्षेत्र अधिकारी फणसाड वन्यजीव अभयारण्यातर्फे मुरुड तालुक्यात 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. सदर सप्ताहानिमित्त मुरुड तालुक्यातील मजगाव येथील नाज ॲकॅडमी इंग्रजी माध्यमाच्या हायस्कूलमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी फणसाड अभयारण्याचे वनक्षेत्रपाल तुषार काळभोर वनपाल आदेश पोकळ, वनरक्षक अरुण पाटील, सुनील जाधवर, कोरबा खांडेकर, संतोष पिंगळा, ग्रीन वर्क ट्रस्टचे संस्थापक निखिल भोपळे, श्रीमती कृपा, श्रीमती सोनम, श्री. ऋषिकेश आदिच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यात दिलकश दिलावर कुट्टी (प्रथम ) रेहान बन्ने अहमद मन्सउरई (व्दितीय) नुसेबामुश्ताक कादंबरी (तृतीय) व जाझिम जमशेद टके (उत्तेजनार्थ) यांचा समावेश आहे. यावेळी हायस्कूलचे मतीन हमदुले, आशिष बुल्लु, प्रितम वाळंज, मनाली पाटील, रुमान परदेशी, रुपेश्री मकू आदि शिक्षक- शिक्षिका उपस्थित होते.

Exit mobile version