| कोर्लई | वार्ताहर |
आगामी 24 व्या राज्यस्तरीय सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील खेळाडूंचे मनोधैर्य वाढवून दमदार व चमकदार कामगिरी करता यावी यासाठी दि. रायगड जिल्हा सिकई मार्शल आर्ट असोसिएशनच्यावतीने सर्व तालुक्यांत विशेष प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती जिल्हा सिकई संघटनेचे अध्यक्ष विजय तांबडकर यांनी दिली.
नुकत्याच गोवा येथे संपन्न झालेल्या 37 व्या राष्ट्रीय खेळात महाराष्ट्राने सर्वाधिक 228 पदके मिळवून प्रथम क्रमांकाचा राजा भलिंद्रसिंग चषक पटकावला. विशेष म्हणजे, राष्ट्रीय खेळात सहभागी सिकई मार्शल आर्ट या खेळाचे संघ प्रशिक्षक मास्टर विजय चंद्रकांत तांबडकर हेच होते. ही परंपरा पुढे चालू राहावी, या हेतूने आगामी 24 व्या राज्यस्तरीय सिकई स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील खेळाडूंचे मनोधैर्य वाढविण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विशेष कौशल्य प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. आपल्या परिसरात सिकई मार्शल आर्ट खेळाचे प्रशिक्षण उपलब्ध नसल्यास त्वरित महाराष्ट्र सिकई असोसिएशनशी संलग्न असलेल्या दि. रायगड डिस्ट्रिक्ट सिकई मार्शल आर्ट असोसिएशन या अधिकृत संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय तांबडकर यांना 7208400201 संपर्क साधावा, असे आवाहन सिकई असोसिएशनच्यावतीने करण्यात आले आहे.