भडवळला विकासाच्या वाटेवर आणणार; पंडित पाटील यांची ग्वाही

| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालक्यातील भडवळ गावातील विकास कामे करण्यास शेतकरी कामगार पक्ष कटिबध्द आहे. त्यामुळे प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करून भडवळ गावाला विकासाच्या प्रवाहात आणण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे असे आश्‍वासन पंडित पाटील यांनी यावेळी दिले.


दामत भडवळ ग्रामपंचायतमधील भडवळ गावातील भगवान शंकर मदिरासमोर सेस फंडातून उभारण्यात आलेल्या सभामंडपाचे उद्घाटन रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार पंडित पाटील यांचे हस्ते झाले. तर भडवळ गावातील पातळीचा माळ ते भडवळ गाव या रस्त्याचे आणि भडवळ गावाचे स्वागत कमान या कामांचे भूमिपुजन माजी आमदार आणि शेकापचे नेते पंडित पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी शेकापचे नेते विलास थोरवे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती नारायण डामसे, शेकापचे जिल्हा खजिनदार श्रीराम राणे, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र हजारे, नेरळ विवीध विकास कार्यकारी सोसायटी अध्यक्ष राजेंद्र विरले, कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गजानन पेमारे, दामत ग्रामपंचायतचे सरपंच जाबिर नजे, ज्येष्ठ कार्यकर्ते रविंद भोईर, विष्णू कालेकर, आदी प्रमूख मान्यवर उपस्थित होते. यावेळी कर्जत पंचायत समितीच्या माजी उपसभापती जयवंती हिंदोळा, शेकाप तालुका पुरोगामी युवक आघाडी अध्यक्ष वैभव भगत, तालुका उपाध्यक्ष अनिल जोशी, शेकाप विभागीय चिटणीस पांडुरंग बदे, आदींसह दामत भडवल ग्रामपंचायतचे माजी सरपंच अमर म्हसकर, माजी उपसरपंच कैलाश म्हसकर, तसेच ग्रामपंचायत ज्येष्ठ कार्यकर्ते बादशाह पाटील, दशरथ कालेकर, सुनील पाटील, गोपाळ मराडे, दशरथ शेळके, प्रसन्न पाटील, सदस्य हरिंचद्र वाघ, पुनम पाटील, दिलीप पाटील, किशोर घारे, दिनेश आदी उपस्थित होते.


भडवळ गावातील अंतर्गत रस्त्याचे आणि स्वागत कमानीचे भूमिपूजन केल्यानंतर ग्रामस्थाशी संवाद साधताना पंडित पाटील यांनी आपल्या आजोळ गावातील कोणतीही विकास कामे प्रलंबित राहणार नाही याची काळजी मी घेणार आहे. त्यांनी पुढे बोलताना गावाचा नियोजनबद्ध विकास करून भडवळ गावाला विकासाच्या प्रक्रियेत आणण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे असून भडवल गाव हे विकासकामांमध्ये कुठेही मागे राहणार नाही याची काळजी शेकापचे कार्यकर्ते यांनी घ्यावी असे आवाहन करून गावातील पक्षाचे कार्यकर्ते यांनी विकासाचा आराखडा बनवून आपल्याकडे आणावा आणि त्यासाठी माझ्याकडे तसेच पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जयंत पाटील तसेच जिल्हा सरचिटणीस आस्वाद पाटील यांच्याकडे पाठपुरावा करावा असे आवाहन केले. भडवळ गावातील शेकापच्या कार्यकर्त्यांची एकजूट आणि तळमळ विकासकामांसाठी कायम आपण पाहत आहोत, त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी विकास कामांची जंत्री कायम ठेवण्यासाठी शेकापला साथ देण्यासाठी अख्ख्या तालुका पिंजून काढा अशा सूचना कार्यकर्त्यांना केल्या.

Exit mobile version