| मुंबई | प्रतिनिधी ।
राज्यात अनेक ठिकाणी ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु आहे, याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी प्रश्न उपस्थित करीत सरकारचे लक्ष वेधून घेतले. त्यावर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या ज्या ठिकाणी ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असतील, त्या बारचे परवाने तात्काळ रद्द करण्यात येतील, अशी ग्वाही दिली. दरम्यान, अधिवेशन काळात ‘कृषीवल’ने याप्रश्नी आवाज उठवून पनवेल, खालापूर परिसरात कुठे कुठे अशा प्रकारचे अवैध धंदे सुरू आहेत, याचा भांडाफोड केल्याने बारचालकांचे धाबे दणाणले आहेत.







