| म्हसळा | वार्ताहर |
म्हसळा तालुक्यातील सर्वच गावांमध्ये विकासकामे पूर्ण करण्याचे आश्वासन खा.सुनिल तटकरे यानी दिले आहे.निगडी येथे अंगणवाडी इमारत बांधकाम उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सरपंच महादेव भिकू पाटील,गाव अध्यक्ष गणू बार आणि माहिला मंडळ अध्यक्षा संगीता आंबेकर समीर बनकर, जि.प. सभापती बबन मनवे, सभापती छाया म्हात्रे, उपसभापती संदिप चाचले, माजी सभापती उज्वला सावंत, माजी सभापती महादेव पाटील, नगराध्यक्ष असहल कादरी,उपनगराध्यक्ष सुनिल शेडगे, पं.स.सदस्य मधुकर गायकर, युवक अध्यक्ष फैसल गीते, नगरसेवक नासीर मिठागरे, सरपंच अनिल बसवत, संतोष उर्फ नाना सावंत, किरण पालांडे,गजानन पाखड, महेश घोले, प्रकाश गाणेकर, महिला अध्यक्षा रेश्मा कानसे,मीना टिंगरे, अनिल टिंगरे आदि मान्यवर उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक सरपंच महादेव पाटील यांनी केले.