धनगर समाजाला सर्वोतोपरी सहकार्य करणार- आ. शेखर निकम

| चिपळूण | प्रतिनिधी |

धनगर समाजाचे चिपळूण मधील सदस्य आणि पुणे येथील समाजबांधव यांनी पुणे येथे आयोजित केलेल्या भव्य कबड्डी स्पर्धा चिपळूण सारख्या तालुक्यातून येऊन आयोजित केल्यात हे निश्‍चितच कौतुकास्पद आहे. या समाजाचा जो दुपट्टा देऊन सन्मान केला त्याच्याशी बांधिलकी ठेऊन या समाजाचा एक घटक म्हणून जे काही सहकार्य करता येईल ते सर्वोतोपरी करू असे आश्‍वासन चिपळूण-संगमेश्‍वर चे आमदार शेखर निकम यांनी दिले.

धनगर समाज पुणे श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर चषक भव्य कबड्डी स्पर्धेचे कर्वेनगर पुणे येथे चिपळूण संगमेश्‍वरचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते रविवार (दि.20) उदघाटन झाले त्याप्रसंगी ते बोलत होते.

सम्राट अशोक विद्यालय, कर्वेनगर, पुणे याठिकाणी भरविण्यात आलेल्या या स्पर्धेस सुजाता पालांडे, संजय भोसले, रुपेश कदम, दादा साळवी, जयंत शिंदे, संतोष वरक, एन.जी. खरात, सागर फाटक, अजित मासाळ पुणे, गजानन धरकुडे, संतोष जानकर, जानू आखाडे, रेवण सूळ, स्वप्नील शिंद, भागोजी शिंदे, राजेश पळसकर, दिनेश शिंदे, शांताराम बेड, परशुराम खरात, रामकृष्ण गोरे, महादेव खरात, बाबुराव गोरे, लक्ष्मण बेडगे, रामचंद वरक, सुरेश हिरवे, काशिनाथ गोरे, दिपक कोकरे, आनू खरात, आबू गोरे, विष्णू माने, बारकु खरात, विजय कोकरे, जानू बापू वरक, बाबू रा. खरात, रामचंद्र शेळके, आनंद शिगाटे, सुरेश वरक, सदानंद झोरे, बचन मेडगे, अनिल देवे, बबन था. शेळके, दिपक ना. खरात, सुरेश धों. कोकरे, बारक्या माने आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचे आयोजन भगवान बाबाराम शिंदे, संतोष जनार्दन वरक, विकास भागवत माने, प्रशांत विठ्ठल येडगे, संजय रामचंद्र बावधने, सुमित गोविंद कोकरे, पांडूरंग नारायण शेळके, आनंद विठ्ठल कोकरे, प्रकाश विठ्ठल हिरवे, राजाराम सहन मोरे, मंगेश बबन, नरेश सुरेश हिरवे पांडुरंग माने, मधुकर सिताराम जानकर, रुपाजी पांडुरंग गोरे, विकास बाबा कोकरे, प्रकाश लक्ष्मण खरात आदींनी केले होते.

Exit mobile version