‘सह्याद्री’ला सर्वतोपरी सहकार्य करणार

मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांची ग्वाही
नेरळ । वार्ताहर ।

पर्यटनस्थळ म्हणून नावलौकिक असलेल्या माथेरानच्या जडणघडणीत आपत्कालीन परिस्थितीत अविभाज्य घटक म्हणून नावारूपाला येऊ पाहत असलेल्या सह्याद्री मित्र आपत्कालीन सामाजिक संस्थेच्या सर्व सदस्यांची ओळख करून घेण्यासाठी तसेच रेस्क्यु टिमचे कार्य जाणून घेण्यासाठी माथेरान नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी माथेरान नगरपरिषद दालनात छोटेखानी चर्चासत्र घडवून आणले होते.या चर्चासत्रात रेस्क्यू टीमला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही दिली.

यावेळी सह्याद्री मित्र आपत्कालीन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आजतागायत केलेले बचावकार्या संदर्भात माहिती घेताना मध्यंतरी रात्रीच्या अंधारात निशांत गुप्ता या तरुणाचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्याकरिता केलेल्या रेस्क्युचे कौतुक करत. माझ्या कार्यक्षेत्रात आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी साहसी तरुणांचा देखील भरणा असल्याने मी अभिमान व्यक्त करते त्याचबरोबर सह्याद्री रेस्क्यु टीम सोबत आपत्कालीन परिस्थितीत मला काम करायला आवडेल असे देखील मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी मत व्यक्त केले.

महिला अधिकारी असुन आपुलकीने संस्थेच्या विषयी तसेच सदस्यांबाबत विचारपूस करून संस्थेला रेस्क्यु दरम्यान येणार्‍या समस्या जाणून घेत लवकरात लवकर रेस्क्युसाठी जे जे आवश्यक साहित्य नगरपरिषदेच्या माध्यमातून कींवा अन्य माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच रेस्क्युवेळी आपल्या रेस्क्यु टीमसाठी तात्काळ रुग्णवाहीका उपलब्ध करून देण्यासाठी तशा प्रकारचे आदेश संबंधित विभागाला देण्यात येतील.अशी ग्वाही दिल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष वैभव नाईक यांनी समाधान व्यक्त केले. येत्या काही दिवसात माथेरानच्या सभोवताली डोंगर दर्या मध्ये रहीवास असलेल्या तसेच ज्यांचा उदरनिर्वाह माथेरानवर अवलंबून आहे.अशा वाड्या वस्तीतील आदिवासी बांधवांसाठी देखील समाजकार्याच्या माध्यमातून आपल्या टिम सोबत कार्य करण्याचा मानस असुन व्हिलेज ट्रेकिंग, जंगल ट्रेकींगच्या तसेच साहसी खेळांच्या माध्यमातून येथील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल असे देखील भणगे यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version