अंनिस करणार बुवा-बाबांचा भांडाफोड

पाली/बेणसे | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा रायगडची जिल्हा बैठक नुकतीच पाली विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बुवा बाबांचा भांडाफोड करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत अ‍ॅड. मुक्ता दाभोळकर यांच्या जिल्हा दौर्‍याचे नियोजन करण्यात आले. त्याचबरोबर संघटनेच्या आगामी उपक्रमांचे रूपरेषा ठरविण्यात आली. जिल्ह्यात बुवा-बाबांचा भांडाफोड करण्यासाठी व्यवहरचना आखण्यात आली. कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबीर व वक्ता शिबिर भरविण्यासंदर्भात नियोजन केले गेले. आगामी काळात समविचारी लोक व तरुणांना संघटनेत सहभागी करून त्यांच्या खांद्यावर विविध पदांची धुरा देण्यात येईल व संघटना अधिक मजबूत करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले.
या बैठकीस जिल्हा अध्यक्ष विवेक सुभेकर, जिल्हा कार्याध्यक्ष मोहन भोईर, जिल्हा प्रधानसचिव संदेश गायकवाड, राज्य सदस्य निलेश घरत व भाऊ सावंत, जिल्हा युवा कार्यवाह अमित गवळे, जिल्हा बुवाबाजी संघर्ष प्रमुख अमित निंबाळकर, सम्यक क्रांती विचारमंच अध्यक्ष मंगेश वाघमारे, अमोल कांबळे व ए. एस. जमदाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version