| मुंबई | प्रतिनिधी |
महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाला आरक्षण दिले नाही .मात्र आमचे सरकार न्यायालयातील प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून ओबीसी समाजाला आरक्षण दिले जाईल,असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात पत्रकारांना सांगितले. विधानसभा अध्यक्ष निवडीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की,आरे कॉलनी मध्ये मेट्रो कारशेडचे 25 टक्के काम झाले आहे .मात्र मागच्या सरकारने कोणाचे तरी भले करण्यासाठी कांजूर मार्गला कारशेड हलविण्याचा प्रयत्न केला .मात्र आम्ही लोकांचा पैसा वाया जाऊ देणार नाही . पावसाळ्याचे 3 महीने सोडले तर 1 वर्षात एक हि झाड़ न तोड़ता आरे मध्ये मध्ये कार शेडचे काम पूर्ण केले जाईल. बुलेट ट्रेनसाठी भुसंपादनाचे काम झाले आह.बीकेसी मध्ये असलेल्या भुगर्भात 15 माल्या पर्यन्त खाली जागा आहे .लवकरात लवकर बुलेट ट्रेन च्या कामालाही गती मिळेल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मराठा आरक्षणा बाबत न्यायालयाची लढाई लढावी लागेल , कालच माझी संभाजी राजे छत्रपती यांच्याशी भेट .झाली,असे त्यांना सुचित केले. दोन्ही शिवसेनेच्या प्रतोदांनी केलेला दाव्या बाबत बोलताना फडणवीस म्हणाले की सुनिल प्रभु यांनी व्हिप बजावल्याचा जो सभागृहात दावा केला आहे .ते न्यायालयात त्यांची बाजू मांडण्यासाठी मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमलेल्या मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनीही शिवसेनेच्या आमदारांना व्हिप बजावलेला आहे .त्यांच्या कड़े 2/3 बहुमत आहे . यावर अध्यक्ष काय निर्णय देतात त्यावर अवलंबुन आहे .कदाचित सुनिल प्रभु यांचा दावा अध्यक्ष फेटाळू शकतात .न्यायालयातही ते टिकेल की नाही यांची शंका वाटते,असे फडणवीस म्हणाले.
शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी होती म्हणूनच इतक्या मोठ्या संख्येने बंडखोरी झाली , शिवसेनच्या खासदारामध्येही नाराजी आहे .ती त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून सांगितल्याची माहिती आहे.त्यांना राष्ट्रवादी आणि कोंग्रेस बरोबर सरकार मध्ये गेल्याचे रुचले नाही.2024 मध्ये तर 2014 आणि 2019 पेक्षाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट येणार आह.त्यामुळे आता शिवसेनेत असलेले 18 खासदारांची संख्या किती वर येईल ते सांगता येत नाही,असे फडणवीस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात नमूद केले.
गुजरातमध्ये गेलेल्या आर्थिक केंद्राबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, ते केंद्र काँग्रेस सरकारच्या काळात गेले आहे.10 ते 12 वर्षे काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी वेळकाढूपणा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी ती मागणी केली होती.ती केंद्र सरकारने मान्य केली आता कोंग्रेस वाले भाजपच्या नावाने शंख करत आहेत . आता आम्ही ती मागणी करणार आहोत. राज्याच्या आर्थिक स्थिति बाबत विचारले असता फडणवीस म्हणाले की महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे . निधी बाबत तुठवड़ा येणार नाही . हे मला चांगले माहित आहे,असा दावाही त्यांनी केला.
मुख्यमंत्रीपदाबाबत एकनाथ शिंदे यांच्या शिवाय कोणालाच माहित नव्हते,तो सर्वांसाठी धक्का होता मात्र त्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची पक्षाकडून झालेली घोषणा हा माझ्यासाठी धक्का होता. राजकरणात असे धक्के येतच राहतात.अजून सर्वोच्च न्यायालयात महाविकास आघाडी लढा देत आहे.कोण जाणो तो आम्हालाही धक्का असेल.
देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री