। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग विधानसभा मतदार संघातील मतदान बुधवारी (दि.20) होत आहे. अलिबाग विधानसभेच्या महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांना मताधिक्य देणार, असा विश्वास शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षातील अलिबाग शहर प्रमुख संदीप पालकर यांनी व्यक्त केला आहे. तसेच, चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून शेकापसह महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) आदींनी पाठींबा दर्शविला आहे. तसेच, प्रचार सभा, बैठका, रॅलीतून सहभाग नोंदविला आहे. यावेळी गद्दारी करणार्यांना जागा दाखविण्यासाठी शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते या निवडणूकीत पूर्ण ताकदीनीशी मैदानात उतरले असल्याचेदेखील संदीप पालकर यांनी सांगितले आहे.