तालुक्यात काँग्रेसची ताकद वाढवणार- भास्करराव चव्हाण

| खारेपाट | वार्ताहर |

खारेपाटासह अलिबाग तालुक्यात काँग्रेस पक्षाची ताकद वाढवणार, असे मत आलिबाग तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भास्कर चव्हाण यांनी खारेपाटात व्यक्त केले. यावेळी खारेपाटण विभाग काँग्रेस अध्यक्ष वैभव पाटील व अनेक ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या भेटीगाठी घेऊन काँग्रेस पक्ष वाढविण्याच्या दृष्टीकोनातून सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच अलिबाग तालुक्यातील जनतेचे प्रश्‍न शासन स्तरावर मांडून ते सोडवले जातील, असे मत तालुकाध्यक्षांनी व्यक्त केले.

नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष भास्कर चव्हाण यांनी अलिबाग तालुक्यातील तळवली, वाडगाव, सातघर, खिडकी, शेखाचा गाव, फोफेरी, चिंचवली, कावाडे येथे दौरा करून काँग्रेस ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन संवाद साधत विचारपूस केली. यावेळी वाडगावचे कमळाकर वेंगुर्ले, तळवलीचे उमेश नाईक यांचे कुटुंबीय, सातारचे विजय पाटील, खिडकीचे वैभव पाटील, चिंचवलीचे जगनभाऊ पाटील, रमाकांत गुरुजी, प्रमोद गावंड, शेखाचा गाव येथील ज्येष्ठ काँग्रेस नेते अ‍ॅड. बी.एस.पाटील, रवींद्र पाटील, युवा कार्यकर्ते रोहित पाटील, प्रणय पाटील व रणजित पाटील यांचे कुटुंबिय, कावाडे येथील जगन्नाथ पाटील व त्याचे कुटुंबिय यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. या दौर्‍यात कृष्णा भोपी सरपंच बेलोशी, प्रभाकर राणे सरचिटणीस रायगड जिल्हा कमिटी, जगदीश कवडे व जितेंद्र भोईलकर उपस्थित होते.

Exit mobile version