भारत कुपोषणमुक्त होणार?

केंद्राकडून रोड मॅप तयार करण्याचं काम सुरु
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन घोषणा केली होती, की 2024 पर्यंत देशातील सर्व गरिबांना वेगवेगळ्या माध्यमातून व्हिटॅमिन, आयर्न आणि इतर पोषक घटक असलेले तांदूळ देण्यात येणार आहेत. देशातील ज्या लोकांमध्ये पोषणाची कमी आहे, त्या लोकांमध्ये या घटकांची कमतरता दूर करण्याचे लक्ष्य आहे. पंतप्रधानांनी केलेल्या या घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी आता सरकार रोड मॅप तयार करत आहे.
सायन्स मॅग्जिन असलेल्या द लॅन्सेन्टच्या एका आकडेवारीनुसार, आपल्या देशातील प्रत्येकी दुसरी महिला ही कुपोषणाची बळी आहे. त्याचप्रमाणे देशातील प्रत्येकी चौथे बालक हे कुपोषणाचे बळी आहे. भारतातील प्रत्येकी तिसरे बालक हे लहान उंचीचे आहे. तसेच भारतातील प्रत्येकी पाचवे बालक हे शारीरिकरित्या दुर्बल आहे. ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताचा जगात 94 वा क्रमांक लागतो.

Exit mobile version