शेतकर्‍यांची सर्वांगिण प्रगती करणार

कृषी विभागाचा निर्धार
। नेरळ । वार्ताहर ।
शेतकर्‍यांची प्रतिष्ठा वाढली पाहिजे, शेतकर्‍यांची सर्वांगीण प्रगती झाली पाहिजे, आपला शेतकरी चिंतामुक्त झाला पाहिजे, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्हिजन आहे, त्या दृष्टीकोनातून कृषी विभाग कार्य करणार असल्याचे प्रतिपादन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी कर्जत-नेरळ येथे येऊन पाहणी केली. कृषी विभागाचे विविध उपक्रम व नियोजन दिशा याकरिता कृषी मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली नेरळ येथील सगुणा बाग येथे बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, शेखर भडसावळे आणि जिल्हा व तालुका कृषी अधिकारी हे उपस्थित होते.

प्रगतशील व नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी ओळखले जाणारे शेतकरी कृषीभूषण शेखर भडसावळे यांच्या सगुणा बागेस भेट देत भुसे यांनी तेथील नाविन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी केली. शेखर भडसावळे यांनी शेतात लागवड केलेल्या पिकांची, शेतातच तयार करण्यात आलेल्या नैसर्गिक व रासायनिक खताबाबत, पिकविलेल्या पालेभाज्या व कडधान्ये, पिकांच्या गुणवत्तेबाबतची माहिती यावेळी कृषी मंत्री भुसे यांना दिली.

Exit mobile version