मोदीजी 2024 मध्ये जिंकाल का; नितीशकुमार यांचा सवाल

। पाटणा । वृत्तसंस्था ।

नरेंद्र मोदी सन 2019 मध्ये जिंकले होते,पण आता येणार्‍या निवडणुकीत ते यशस्वी होतील का, असा सवाल बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यानी उपस्थित केला आहे. भाजपाशी काडीमोड घेत नितीशकुमार यांनी बुधवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

निवडणूक काळात भाजपचे वागणं योग्य नव्हतं. आमच्या लोकांनी त्यांना पाठिंबा दिला. पण त्यांच्याकडून जदयूला हरवण्यासाठीच प्रयत्न केले गेले. मी आमच्या पक्षातील सर्वांशी चर्चा केली. सगळ्यांच्याच मनात या आघाडीत राहायला नको हीच भावना होती. म्हणून साथ सोडण्याचा निर्णय घेतला, असं नितीश कुमार म्हणाले आहेत.

नितीशकुमार यांनी राष्ट्रीय जनता दल (राजद) तसेच इतर मित्रपक्षांना सोबत घेऊन महागठबंधनची स्थापना केली आहे. राजदचे नेते तेजस्वी यादव यांनीदेखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. महागठबंधनमधील सर्व पक्षांचे एकूण 164 आमदार असून या आमदारांच्या पाठींब्याचे पत्र त्यांनी राज्यपालांकडे सोपवले होते.

Exit mobile version