राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?

| मुंबई | वृत्तसंस्था ।

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेला मोठा फटका बसला असून ‘शिवसेनेने साद घातली तर ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या होत्या. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

त्यानंतर राज ठाकरे ॲक्शन मोडवर आले असून आयोध्या दौरा रद्द झाल्यावर त्यांची शस्त्रक्रिया झाल्यांनतर आता पहिल्यांदाच त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. राज्यातील राजकीय अस्थिरतेचा फायदा घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर उद्या राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार तसेच आपल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.

शर्मिला ठाकरेंच्या विधानानंतर उद्याच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे काय निर्णय घेणार, तसेच शिवसेनेसोबत जाण्यासंदर्भात काही बोलणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Exit mobile version