नोंदणीकृत पक्षाचे उमेदवार बिघडवणार

प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची गणित?

| पनवेल | वार्ताहर |

मावळ लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होणार असल्याचे बोलण्यात येत आहे. मात्र महायुती आणि आघाडीच्या उमेदवारांसोबत राष्ट्रीय स्थरावरील पक्ष म्हणून नोंद असलेल्या मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीचे हत्ती हे निवडणूक चिन्ह घेऊन आपला उमेदवार मावळच्या रींगणात उतरवला असून, नोंदणीकृत पक्षाचे इतर 11 उमेदवार देखील रिंगणात असल्याने हे उमेदवार घेणार असलेली मते कोणत्या उमेदवारांच्या विजयाची गणित बदलतात हे पाहणं औस्त्युक्याचे ठरणार आहे. मावळ लोकसभा मतदार संघात (दि.13) मे रोजी निवडणुका पार पडणार आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. दोन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते सध्या प्रचारात व्यस्थ असून, ग्रामीण तसेच शहरी भागात घरोघरी उमेदवारांचा प्रचार सुरु असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराणमध्येच प्रमुख लढत होणार असे मानले जात आहे. मात्र त्याच वेळी रींगणात असलेल्या इतर उमेदवारांना मात्र दुर्लक्षित केले जात असून, ऐन वेळी विजयाची गणित बदलण्याची क्षमता असलेले हे उमेदवार प्रमुख उमेदवारांणा डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

वंचितचे राजाराम पाटील

2019 साली पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राजाराम पाटील हे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी कडून निवडणूक रिंगणात उतरले होते. पाटील यांनी त्या वेळी तब्बल 75 हजारा पेक्षा जास्त मते घेत आपली ताकत दाखवली होती. स्थानिक प्रकल्पग्रसतांच्या बाजूने कायम सिडको तसेच इतर प्राधिकरणा विरोधात नेहमीच आक्रमक भूमिका घेणार्‍या पाटील यांना यंदा वंचित ने उमेदवारी नाकारल्याने ते बसपा च्या हत्ती या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढत आहेत.
वंचितकडून माधवी जोशी
वंचित बहुजन आघाडी कडून ऑटो रिक्षा या चिन्हावर माधवी जोशी यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहे. जोशी यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातून नुकताच वंचित मध्ये प्रवेश केला असला तरी मावळ लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याच्या उद्देशाने त्यांनी मागील वर्षभरापासून तयारी केली आहे. त्या मुळे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षा मतदारांचा देखील त्यांना काही प्रमाण पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. आगरी समाजाचा उमेदवार म्हणून कार्ड खेळल्यास पनवेल उरण आणि कर्जत या आगरी समाजाचे प्राबळ्य असलेल्या भागातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
धर्मराज्य पक्ष देखील रिंगणात
मावळ च्या रिंगणात कामगार नेते राजण राजे यांच्या नेतृत्वाखालील धर्मराज्य पक्षाने देखील आपला उमेदवार उतरवला आहे. पनवेल विधानसभा क्षेत्रात राजे यांना मानणारा मोठा वर्ग असून स्थानिक रिक्षा चालक मालक संघटना तसेच काही ठिकाणच्या कारखान्यामधील कामगार राजे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत.
आपचा पदाधिकारी
अपक्ष म्हणून रिंगणात
दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीचा इंडिया आघाडीत समावेश आहे. मावळ लोकसभा मतदार संघात आप चे कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारात धडाडीने भाग घेत आहेत. असे असले तरी पनवेल विधानसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकारी असलेले चिमाजी शिंदे हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असल्याने वंचित ची मत त्यांच्या कडे जाण्याची शक्यता आहे.
Exit mobile version