एसटी विलीनीकरण होणार का? थोड्याच वेळात होणार फैसला

। मुंबई । वृत्तसंस्था ।
एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेल्या 109 दिवसांपासून सुरु आहे. अखेरीस आज एसटीच्या विलीनीकरणावर कोर्टात फैसला होणार आहे. गेल्या अनेक दिवासांपासून राज्य सरकारकडून अनेकदा आवाहन करूनही हा सम्प अद्यापही सुरूच होता. इतके दिवस एसटीच्या संपामुळे महामंडळाचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले आहे. परंतु, विलीनीकरणाचा निर्णय येण्याच्या काही वेळ आधीच महामंडळाकडून एकादिलासादायक स्पष्टीकरण देण्यात आले आहे. संपामुळे झालेल्या कोट्यावधी रूपयांच्या नुकसानाची कोणत्याही प्रकारची भरपाई ही नुकसान कर्तव्यावर रूजू झालेल्या कामगारांकडून वसूलकेली जाणार नसल्याची स्पष्टोक्ती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी आज दिली. त्यामुळे निर्णय येण्याआधीच एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Exit mobile version