आ. रवींद्र धंगेकर यांची ग्वाही; डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते सत्कार
| कोळा । प्रतिनिधी ।
पुणे कसबा विधानसभा मतदारसंघाचे अटीतटीच्या लढतीमध्ये मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले आ. रवींद्र धंगेकर यांचा शेकापच्या वतीने शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी स्व. भाई गणपतराव देशमुख यांनी जनतेसाठी केलेले काम यांचा आदर्श ठेवून सर्वसामान्य जनतेसाठी गोरगरिबासाठी समाजकारण राजकारण करणार असल्याचे विचार आ. दंगेकर यांनी व्यक्त केले. यावेळी सर्व नेतेमंडळी पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे येथे महानगरपालिकेच्या आवारात आ. धंगेकर व डॉ बाबासाहेब देशमुख यांची सदिच्छा भेट झाली. यावेळी पुणे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन जोशी, रामा फलटणे, अशोक नरळे, मधुकर कांबळे, रफिक तांबोळी, बाळासाहेब देशमुख, सुभाष करांडे, जगदीश कुलकर्णी, यांच्यासह आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील राजकारणातील भीष्म पितामह स्व. गणपतर देशमुख यांचे फार मोठे कार्य होते. राज्याच्या राजकारणातील मोठं नाव होते विधानसभेमध्ये केलेले आबासाहेब यांचे काम विचार डोक्यात ठेवून समाजकारणात राजकारणात सक्रिय काम करत राहणार आहे.
रवींद्र धंगेकर, आमदार
दोन जननायकांची भेट
अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्य स्पर्शाने पावन झालेल्या पवित्र भूमी मध्ये व पुणे महानगरपालिकेच्या आवारामध्ये आ रवींद्र धंगेकर डॉ बाबासाहेब देशमुख दोन जननायकांची भेट झाली हा एक सुवर्णयोग आहे.