| माउंट माउंगानुई । वृत्तसंस्था |
दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या पहिल्या कसोटीत न्यूझीलंड क्रिकेट टीम मजबूत स्थितीत आहे. न्यूझीलंडने दुसर्या डावात तिसर्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत केन विलियमसन याच्या शतकी खेळीच्या जोरावर 528 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. केन विलियमसनने या सामन्यातील पहिल्या डावानंतर दुसर्या डावातही शतक ठोकलंय. केनने या शतकासह मोठा कारनामा केला आहे. केनने यानंतर आता विराट कोहलीनंतर आता इंग्लंडच्या जो रुट यालाही मागे टाकलं आहे.
क्रिकेट चाहत्यांना केन विलियमसनकडून दुसर्या डावात पहिल्या डावातील एक्शन रिप्ले पाहायला मिळाला. केनने दुसर्या डावात 125 धावांच्या मदतीने शतक झळकावलं. केनने या शतकी खेळीत 12 चौकार लगावले. केनने दुसर्या डावात 109 धावा केल्या. केनच्या कसोटी कारकीर्दीतील हे 31 वं शतक ठरलं. केन यासह कसोटीत सर्वाधिक शतकांच्या बाबतीत जो रुट याच्या पुढे निघाला. रुटच्या नावावर 30 शतकं आहेत. तर पहिल्या डावातील शतकासह केनने विराटला मागे टाकलं. विराटच्या नावावर टेस्टमध्ये 29 शतकांची नोंद आहे.