विंडीज पाच बाद 229 धावा

। पोर्ट ऑफ स्पेन । वृत्तसंस्था ।

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दरम्यान सुुरु असलेल्या दुसर्‍या कसोटीत तिसर्‍या दिवशी यजमान संघाने पाच गडी गमावत 229 धावा केल्या आहेत. पहिल्या डावाच्या आधारे वेस्ट इंडिज भारतापेक्षा 209 धावांनी मागे आहे. वेस्ट इंडिजकडून अ‍ॅलिक अथांजे आणि जेसन होल्डर नाबाद परतले. अ‍ॅलिक एथंजे 111 चेंडूत 37 धावा खेळत आहे, तर जेसन होल्डर 39 चेंडूत 11 धावा करून नाबाद आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये सहाव्या विकेटसाठी 65 चेंडूत 21 धावांची भागीदारी झाली.

वेस्ट इंडिजने तिसर्‍या दिवशी 1 बाद 86 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. वेस्ट इंडिजकडून कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने 235 चेंडूत सर्वाधिक 75 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 1 षटकार लगावला. वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेट रवी अश्‍विनच्या गोलंदाजीवर बाद झाला. कर्क मॅकेन्झीने 57 चेंडूत 32 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 1 षटकार लगावला. मुकेश कुमारने कर्क मॅकेन्झीला आपला शिकार बनवले.

जर्मेन ब्लॅकवूडने 93 चेंडूत 20 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 2 चौकार मारले. जर्मेन ब्लॅकवुडला रवींद्र जडेजाने बाद केले. जर्मेन ब्लॅकवुडनंतर जोशुआ दा सिल्वाने 26 चेंडूत 10 धावा केल्या. जोशुआ दा सिल्वाला मोहम्मद सिराजने बाद केले. भारतीय गोलंदाजांबद्दल बोलायचे, तर रवींद्र जडेजाने आतापर्यंत सर्वाधिक 2 बळी घेतले. तर मोहम्मद सिराज, रवी अश्‍विन आणि मुकेश कुमार यांना 1-1 गडी बाद करता आले.

Exit mobile version