ग्लोबल महाराष्ट्र बॉलीवूड स्पर्धेचा विजेता स्वप्नील खैरे

। उरण । वार्ताहर ।
नुकतीच दिल्ली येथे ग्लोबल महाराष्ट्र बॉलीवूड इंडिया 2021 ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेचा मानकरी होण्याचे भाग्य श्रीवर्धन तालुक्यातील चिखलप गावातील स्वप्नील खैरे यांना मिळाला आहे. यामुळे स्वप्नीलवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या स्पर्धेत देशभरातून हजारोंच्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते. ही स्पर्धा व्यगतीमत्व, शरीर सौंदर्याची आणि हजर जबाबी तत्पर बुद्धीचातीर्याची असते. या स्पर्धेत स्वप्नील खैरे यांनी यांनी आपल्या जिद्द व चिकाटीच्या जोरावर अंतिम स्पर्धेत बाजी मारीत ग्लोबल महाराष्ट्र बॉलीवूड इंडिया 2021 स्पर्धेचा मानकरी होण्याचे भाग्य लाभले. हे मानाचे पदक मिळवून स्वप्नील खैरे यांनी रायगड जिल्ह्याची मान उंचावली आहे. या यशाबद्दल स्वप्नीलवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
स्वप्निल हा उच्च शिक्षित आहे, त्याने दहावी पास करुन ठाकूर कॉलेज कांदिवली मधून बीएमएम करुन पुढे अनुपम खेर यांच्या अक्टर्स प्रिपेयर मधून अभिनयाचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने देवीप्रसाद गोयंका मॅनेजमेंट कॉलेज ऑफ मीडिया स्टडीज मालाड मधून मास्टर डिग्री मास्टर ऑफ मास मीडिया संपादन केली आहे. असा हा उच्च शिक्षित स्वप्निल आजच्या तरुण पिढीसमोर एक आदर्शच ठरू शकतो.

Exit mobile version