सह्याद्री कर्जत संघ आमदार चषकाचा मानकरी

| शिहू | वार्ताहर |

दत्तवाडी क्रीडा मंडळ सांबरी आयोजित माजी आ. पंडित पाटील चषक, कै. यशवंत गोमा पाटील क्रीडासंकुलनात भव्य दिव्य आदिवासी कब्बड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. या कबड्डी स्पर्धेत द्वितीय क्रमांक गावदेवी धानकान्हे, तृतीय क्रमांक तडवागळे संघ, चतुर्थ क्रमांक श्री. गणेश कोलघर संघाने पटकवला. विजयी संघाना आकर्षक चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

या स्पर्धेचे उद्धघाट्न पंडित पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी बोलताना त्यांनी देशातील विविध राज्यात खेळल्या जाणार्‍या कबड्डी खेळाची महाराष्ट्रात एक वेगळी ओळख आहे. या अस्सल मैदानी व मर्दानी खेळाचे जतन व्हावे, कबड्डीला गत वैभव प्राप्त व्हावे, तसेच रायगडच्या मातीतून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू उदयास यावे, हे या सामन्यांच्या मागचे उद्दिष्ट असल्याचे उपस्थित खेळाडूंना सांगितले. या कार्यक्रमासाठी कुर्डुस माजी सरपंच संदीप पाटील, सुनील पिंगळे, संजू पाटील, विकास पाटील, सीताराम पाटील, सुनील म्हात्रे, संतोष म्हात्रे, सारिखा पाटील, वनिता शेळके, धनु नाईक, मंगेश नाईक, मुरलीधर पाटील, बाबुराव नाईक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version