| खांब | वार्ताहर |
रूरल कॅम्प कॉलेज ऑफ सोशल वर्क निर्मला निकेतन मुंबई यांच्यावतीने जीवनधारा संस्था कोलाड येथे नुकतेच हिवाळी शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आले.
सर्वप्रथम आलेले मान्यवर व विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी यांचे स्वागत करून जीवनधारा संस्थेतील स्टाफ व आलेल्या विद्यार्थ्यांची ओळख करण्यात आली, तसेच जीवनधारा संस्थेबद्दल व्हिडिओद्वारे कसे काम करते ते दाखवण्यात आले. नंतर सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे सागर दहिंबेकर व त्यांची टीम यांनी जंगलातील साप, पशुपक्षी, प्राणी याबाबत माहिती सांगून आग लागल्यानंतर कशी विझवायची याचे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखविले.
शिबिराचा एक भाग म्हणून कामतवाडी खिंडीवाडी पहुरवाडी या वाड्यात तीन टीम बनवून आदिवासीवाडीमधील लोकांचे राहणीमान व जीवन कसे असते याची अनुभूती देऊन वाडीतल्या मुलांसोबत विद्यार्थ्यांनी विविध कृती कार्यक्रम घेण्यात आले. येथील प्राथ. शाळेला भेट देऊन कॅम्प फायर करण्यात आले. तसेच स्नेहवर्धिनी संस्थेलाही भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांना या तीन दिवसांत खूप काही गोष्टी अनुभवायला मिळाल्या. जीवनधारा संस्थेच्या हिल्डा फर्नांडिस व सर्व कार्यकर्ता यांनी या शिबिरात चांगल्या प्रकारे सहकार्य केले. तीन दिवसात विद्यार्थ्यांना काय काय मूल्यमापन अनुभवायला मिळाले ते त्यांनी शेअर केले. यावेळी प्रो. कल्याणी तलवेकर यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले. शेवटी निर्मला निकेतन मुंबई यांच्या वतीने जीवनधारा संस्थेचे आभार व्यक्त करून शिबिराची यशस्वीपणे सांगता करण्यात आली.