परिहवन सेवेच्या चालक, वाहकांचा बेमुदत संप
| ठाणे | प्रतिनिधी |
पगार वाढ, दंड आकारण्याच्या विरोधात मंगळवारी (दि.17) सकाळपासून ठाणे परिहवन सेवेच्या सुमारे 700 चालक, वाहकांनी बेमुदत संप पुकारला आहे.
ठाणे पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेरील सॅटिस पुलावरुन शहराच्या विविध भागांमध्ये जाणार्या ठाणे परिवहन विभागाची (टीएमटी) बसेस फेर्यांमुळे सकाळपासून रात्रीपर्यंत राबता असलेल्या प्रवाशांना सोयीचे पडत होते. परंतु, संप पुकाराल्याने आता प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. आनंद नगर टीएमटी डेपो बंद झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहेतं. या डेपोतून ठाणे, कळवा आणि मुंब्र्यातील विविध भागातील बसेस रवाना होतात. चाकरमान्यांना नोकरीला जाण्यास विलंब झाला असून, परिणामी रिक्षा चालकांची मात्र यामुळे चांदी झाली आहे. परंतु, विद्यार्थ्यांना कॉलेज आणि शाळेत जाण्यास मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.