हिवाळी रानफळे बहरली

| माणगाव | वार्ताहर |

हिवाळा सुरू झाला आहे. हिवाळी दिवसांत रानावनात होणाऱ्या रान फळांना बहर येण्यास सुरूवात झाली आहे. या दिवसात विविध प्रकारच्या रानफळांना बहर येत असतो. यामध्ये बोंडे, आवळा, बोरे, चिंच इत्यादी फळांचा समावेश होतो. चवीला गोड नसणारी आंबट, तुरट वर्गात मोडणारी ही फळे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळे सर्वांसाठी खास आकर्षणाचा भाग आहेत. हिवाळ्यात काटेरी बोरीच्या झाडांवर आढळणारी बोरे पक्व होण्यास सुरुवात झाली असून बाजारात पाच ते दहा रुपयांना ती विकली जात आहेत.

कोकणातील रानावणात होणारी ही बोरे खास वाळवून मीठ लावून उन्हाळी दिवसांसाठीही ठेवली जातात. बोरा प्रमाणेच चिंचांचा मोसम सुरू झाला आहे. दहा ते पंधरा रुपये वाटा याप्रमाणे या चिंचा विकल्या जात आहेत. बोरी चिंचाप्रमाणे बाजारात आवळा उपलब्ध झाले आहेत. आवळे शंभर ते दीडशे रुपये किलो प्रमाणे विकले जात आहेत. आवळ्याचा पेठा, लोणच, चवनप्राश इत्यादी बनविण्याकडे गृहिणीनी पसंत दिली आहे. आदिवासी बांधवांना या फळांच्या मळा तयार करून चांगले अर्थाजनही करत आहेत.

हिवाळ्यातील रानफळे तयार झाली आहेत. जंगलातील वनवे आणि वृक्षतोड यामुळे या रानमेवांच्या झाडांची संख्या कमी होत आहे. तरी या रान फळांचा गोडवा आणि चव खवय्यांच्या जिभेवर कायम रेंगाळत असते.

नयन दसवते, स्थानिक नागरिक

बोरे, बोंडे, आवळा, चिंच इत्यादी रान फळांना बाजारात चांगली मागणी आहे. वाट्यावर, कीलो प्रमाणे हि फळे विकली जातात. यातून आदिवासी कुटुंबाच्या उदरनिर्वाह चालतो.

रऊफ बागवान, विक्रेता माणगाव
Exit mobile version