10 हजारांची लाच घेणार्‍या वायरमनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ‘करंट’

मीटरमध्ये छेडछेड केल्याप्रकरणी मागितली 50 हजार रुपयांची लाच

। सांगोला । प्रतिनिधी ।
मीटरमध्ये छेडछाड केल्याने 50 हजार रुपयांचा दंड न करता 10 हजार रुपये साहेबांकरीता द्यावे लागतील, असे सांगत वायरमनने लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी म.रा.वि. वि कंपनी मर्या. शाखा कार्यालय सांगोला येथे वायरमन पदावर काम करणार्‍या लोकसेवकाला 10 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले असल्याची घटना घडली आहे. राहुल बिरबल गंगणे (वय 30) असे त्या कर्मचार्‍याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी त्यांच्या घरात काही दिवसांपूर्वी लाईट गेल्याने त्याचे मिटरची पाहणी करून त्याचे वायर कट करून चेक केले. तसेच वायर परत मिटरला लावले. परंतु वायर लावताना तक्रारदार यांनी चुकीची वायर जोडणी केली. दिनांक 2 जुलै रोजी वायरमन गंगणे यांनी तक्रारदार यांच्या घराचे मिटर चेक करून मिटरचा फोटो काढला असता, त्यांना विज मिटरमध्ये छेडछाड केली असल्याची बाब निदर्शनास आली. त्यावरून तक्रारदार यांना 50 हजार रुपये दंड लागणार, असे म्हणून साहेबांना बोलून दंड न करण्याबाबत सांगण्याकरिता 10 हजार रुपये साहेबांकरीता द्यावे लागतील असे म्हणून लाच मागणी केली.

याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी करुन अधिकार्‍यांनी सापळा रचला. कारवाईदरम्यान आरोपी लाच रक्कम स्वतः स्विकारत असताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. यातील आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून ही कारवाई मार्गदर्शन अधिकारी म्हणून पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, पर्यवेक्षण अधिकारी संजीव पाटील, सापळा पथक चंद्रकांत कोळी, उमाकांत महाडीक, पोलीस अंमलदार पकाले, सम्णके, पवार आदींनी केली.

Exit mobile version