सुदर्शन सह. भात गिरणी चेअरमनपदी शेकापचे शशिकांत पारवेर

। रेवदंडा । वार्ताहर ।
मुरूड तालुक्यात प्रसिध्दीस असलेली मांडळा सुदर्शन सह. भात गिरणी व भात खरेदीविक्री संघ लि च्या झालेल्या चेअरमनपदाच्या निवडणुकीत शेकापक्षाचा लाल बावटा फडकवीत शशिकांत पारवे यांनी विजय संपादन केला. सुदर्शन सह. भात गिरणी व भात खरेदी विक्री संघ लि. मांडळा मध्ये चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडणूक नुकतीच संपन्न झाली, यामध्ये चेअरमन पदासाठी शशिकांत पारवे, यास्मीन अताउल्ला घय्ये व जाकीरअली हमदुले यांच्यात तिरंगी लढत झाली. शशिकांत पारवे यांना पाच मते, तर यास्मीन घय्ये यांना चार मते तर जाकीरअली हमदुले यांना एक मत मिळाले, त्यामुळे शशिकांत पारवे यांनी एक मताने आघाडी मिळवीत विजय हासिल केला. तर व्हाईस चेअरमनपदासाठी रफाईल लुईस वेगस व फैयाज हुसेन दळवी यांच्यात लढत झाली या लढतीत रफाईल लुईस वेगस यांना नऊ मते तर फैयाज हुसेन दळवी यांना अवघे एक मत प्राप्त झाले, त्यामुळे रफाईल लुईस वेगस यांनी बहुमताने व्हाईस चेअरमनपदावर निवड झाली. सुदर्शन सह. भात गिरणी व भात खरेदी विक्री संघ लि. मांडळा मध्ये चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडणूक सहाय्यक निबंधक श्रेणी अधिकारी प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. त्यांना मांडळा सुदर्शनचे अरूण गुरव यांनी सहकार्य दिले.


या सुदर्शन सह. भात गिरणी व खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत चंद्रकांत चोगले, फैयाज दळवी, प्रदिप धनावडे, जाकीरअली हमदुल, निस्सार नाईक, रफाईल वेगस, यास्मीन घय्ये,लक्ष्मी थळे, शशिकांत पारवे, संतोष कांबळी या सभासदानी सहभाग घेतला. शेकापक्षाचे पारवे यांनी चेअरमपदाच्या निवडणूकीत विजय मिळताच शेकापक्ष कार्यकर्त्यानी जल्लोष केला. चेअरमनपदाच्या निवडणुकीतील विजयाने मांडळा सुदर्शन सह.भात गिरणी व भात खरेदी विक्री संघ लि.वर शेकापक्षाचा लाल बावटा फडकला, यावेळी निवडणुकीत शेकापक्षाचे मुरूड तालुका चिटणीस चक्रधर उर्फ सि.एम.ठाकूर, मंगेश थळे, चंद्रकांत चोगले, माजी चेअरमन जॉव वेगस, संतोष देऊळकर,मांडळा ग्रा.प. माजी उपसरपंच दिपक पाटील, रवि मेहत्तर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Exit mobile version