खासदारांचं निलंबन मागे घ्या, अन्यथा अधिवेशनावर बहिष्कार

विरोधक आक्रमक
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
कृषी कायद्याला विरोध करणार्‍या 5 पक्षांच्या 12 खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यामुळे विरोधी पक्ष आक्रमक झाला असून या विरोधकांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. खासदारांचं निलंबन मागे घेतलं नाही तर आम्ही अधिवेशनावर बहिष्कार टाकू, असा आक्रमक पवित्रा विरोधकांनी घेतला आहे.
राज्यसभेतील 12 सदस्यांना सोमवारी निलंबित करण्यात आले आहे. त्या पाश्‍वर्र्भूमीवर मंगळवारी काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधी पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत खासदारांचं निलंबनावर चर्चा करण्यात आली. निलंबन मागे घेतलं नाही तर अधिवेशनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी निलंबित खासदारांनी माफी मागण्याचा प्रश्‍नच येत नसल्याचंही विरोधकांनी म्हटलं आहे.

पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या वर्तनाची आठवण झाली तरी भीती निर्माण होते. या घटनेचे सभागृहातील ज्येष्ठ नेते समर्थन करणार नाहीत, अशी अपेक्षा मी व्यक्त करतो, मागील अधिवेशन काळात विरोधक सहकार्य करतील, असे वाटत होते. मात्र दुर्दैवाने असे झालं नाही,
एम,वैंकय्या नायडू,राज्यसभाध्यक्ष

Exit mobile version