| कल्याण | प्रतिनिधी |
कल्याण पश्चिमेतील खडकपाडा भागात तीन तृतीय पंथीय आणि त्यांच्या सहकाऱ्याने रात्रीच्या वेळेत एका महिलेचा मार्ग रोखून त्यांच्याकडे 20 हजार रूपयांच्या रकमेची मागणी केली. तसेच, अश्लिल भाषेत शिवीगाळ करून तृतीय पंथीयांनी संगनमत करून महिलेला आणि तिच्या लहान मुलीला मारहाण केली. पाच दिवसापूर्वी ही घटना घडली आहे. याप्रकरणी महिलेने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला या खडकपाडा भागात फ्लाॅवर व्हॅली भागात राहतात. मुलीची तब्येत ठीक नसल्याने त्या आपल्या लहान मुलीला घेऊन रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दवाखान्यात चालल्या होत्या. सोसायटीच्या प्रवेशव्दाराच्या बाहेर पडल्यावर कल्याण पूर्वेतील नेतिवली भागात राहत असलेल्या तीन तृतीय पंथीय आणि त्यांचा एक साथीदार यांनी संगनमत करून महिलेला रस्त्यात अडविले. त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. 20 हजार रूपयांची मागणी केली. महिला पैसे देत नाही म्हणून चारही जणांनी महिलेला ठोशाबुक्क्यांनी, लाथांनी मारहाण केली. मागणीची रक्कम दिली नाहीतर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तिन्ही तृतीय पंथीयांनी आजारी असलेल्या लहान मुलीलाही मारहाण केली.