| छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी |
वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परच्या टायरखाली चिरडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.29) रात्री आठच्या सुमारास चिकलठाणा येथील जिल्हा रुग्णालयासमोरील चौकात घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता, की महिलेचा मृतदेह क्रेन लावून काढावा लागला. मालनबाई चौधरी (50), सुंदरवाडी, असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री आठच्या सुमारास मालनबाई या जिल्हा रुग्णालयाजवळील चौकात रस्ता क्रॉस करीत होत्या. त्यावेळी वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परच्या टायरखाली चिरडून मालनबाई यांचा जागीच मृत्यू झाला. ही बाब तेथील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी गंभीर जखमी मालनबाई यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.