डी-मार्टमध्ये चोरी करणार्‍या महिलेवर गुन्हा

। पनवेल । वार्ताहर ।
खारघर, सेक्टर 15 येथील डी-मार्ट मधून तीन हजार 384 रुपयांच्या वस्तू चोरणार्‍या महिलेविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शबाना सलीम शेख(26) असे या महिलेचे नाव असून, ती अंधेरी येथील रहिवासी आहे.
शबाना शेख डी मार्ट मध्ये आली होती. छोट्या मुलीसोबत आलेली ही महिला काहीही सामान न घेता डी मार्टच्या बाहेर जात होती. त्यावेळेस सिक्युरिटी गार्डला संशय आल्याने तिची झडती घेतली. यावेळी तिच्याकडे अर्धा किलो वजनाच्या काजूचे चार पॅकेट, अर्धा किलो वजनाचे बदामाचे एक पॅकेट, शाम्पू बॉटल आढळून आले. याबाबत तिने कोणत्याही प्रकारचे बिल केलेले नसल्याने तिच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Exit mobile version