उरण एसटी डेपोत बसने महिलेला चिरडले

 | उरण | प्रतिनिधी |

उरण एसटी डेपोत आज (दि.27) पहाटेच्या सुमारास एसटी बसच्या मागच्या टायर खालीयेऊन महिलेला चिरडले गेली. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला असून चालकाला अटक करण्यात आली आहे. यावेळी नातेवाईकांनी बस वाहतूक बंद पाडली. यातच दोन दिवसांपूर्वी एनएमएमटी बस सेवा बंद झाली आणि एसटी अपघातामुळे बंद झाल्याने प्रवाशी वर्गांचे हाल झाले होते.

आज पहाटेच्या 5 च्या सुमारास नेहमीप्रमाणे कालिदा भीमराव शरणागत (52) महिला नेहमीप्रमाणे गाड्या धुवण्याचे काम करीत होत्या. यावेळी अचानक दुसऱ्या बसच्या चालकाने गाडी मागे घेत असताना महिला न दिसल्याने तीच्या अंगावरून मागील टायर गेल्याने ती जबर जखमी झाली. महिलेस उपचारासाठी इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान महिला मयत झाली. यानंतर नातेवाईकांनी बस डेपोतून बस बाहेर पडू दिल्या नाहीत. यामुळे काहीवेळ बस वाहतूक बंद पडली होती.

घटनास्थळी पुणे मुबंई प्रादेशिक उपव्यवस्थापक श्रीनिवास जोशी व इतर अधिकारी दाखल झाले. तसेच, उरण पोलीस ठाण्याचे क्राईमचे निरीक्षक कांबळे, रवी भोईर यांनी यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मयताच्या नातेवाईकांने वारसास कायमस्वरूपी नोकरी देण्याची मागणी केली. यावेळी एसटी बसच्या अधिकारी वर्गांनी आम्ही ताबडतोब 10 हजाराची मदत करू शकतो, त्यानंतर काही दिवसांनी आमच्या फंडातून 10 लाखांची मदत करू व नोकरीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर केला जाईल, असे पुणे मुबंई प्रादेशिक उपव्यवस्थापक श्रीनिवास जोशी यांनी सांगितले. त्यानंतर डेपोतून बस सोडण्यास सुरुवात केली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईमचे निरीक्षक कांबळे हे तपास करीत आहेत.

Exit mobile version