बसखाली चिरडून महिलेचा मृत्यू

| मुंबई | प्रतिनिधी |

दक्षिण मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथीगृहासमोर मंगळवारी (दि.12) भीषण अपघात झाला असून, त्यात बेस्टच्या इलेक्ट्रीक बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या मोटारगाडीला धडक दिली. त्यावेळी बस व मोटरगाडीमध्ये चिरडून महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. महिला स्थानिक रहिवासी असून, मॉर्निग वॉकसाठी तेथे आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, बेस्टच्या इलेक्ट्रिक बसच्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. 105 क्रमांकाच्या इलेक्ट्रिक बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या मोटारगाडीला धडक दिली. बस आणि मोटारगाडीमध्ये चिरडून एका पादचारी महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही महिला मॉर्निंग वॉकला निघाली होती. त्यादरम्यान हा अपघात झाला. महिलेला तातडीने जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली. पोलिसांनी अपघातानंतर तात्काळ स्वतःच्या व्हॅनमधून महिलेला रुग्णालयात नेले. महिलेचे नाव निता शहा असून, त्या रिज रोडवरील प्रकाश बिल्डिंग येथील रहिवाशी असल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version