रसायनीत रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू

। रसायनी । प्रतिनिधी ।

रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पलाटवारी कातकरवाडी येथील हिरा रघुनाथ कातकरी (56) या महिलेचा रेल्वेच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हिरा कातकरी या गुळसुंदे रेल्वे गेट क्रमांक 5 परिसरातील ओएचई पोल क्रमांक 81/12 जवळ असताना दिवा-रोहा मेमो ट्रेन क्रमांक 61011च्या धडकेत गंभीर जखमी झाल्या. या अपघातात त्या बेशुद्ध झाल्या. त्यांना उपचारासाठी चौक येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटने प्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Exit mobile version