तलावात बुडून महिलेचा मृत्यू

| माणगाव | प्रतिनिधी ।

इंदापूर येथील सरकारी दवाखान्याजवळील तलावाच्या पाण्यात बुडून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची खबर राम मालू वाघमारे (42) रा. गौळवाडी आदिवासीवाडी इंदापूर यांनी माणगाव पोलिस ठाण्यात दिली.

सदर घटनेबाबत माणगाव पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, घटनेतील मयत वृद्ध महिला जना मालू वाघमारे (60) रा. गौळवाडी आदिवासीवाडी इंदापूर या रानात लाकडे आणण्यासाठी गेल्या असता तलावाच्या पाण्यात पडून बुडाल्या. त्यांना उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे आणले असता त्यांना डॉक्टरांनी मृत झाल्याचे सांगितले. या घटनेची नोंद माणगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. सदर घटनेचा अधिक तपास सहाय्य्क पोलिस निरीक्षक लहांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दोडकुलकर हे करीत आहेत.

Exit mobile version