पुण्यात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू

| पुणे | प्रतिनिधी |

प्रसूतीसाठी मायमर हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या 37 वर्षीय महिलेचा आणि तिच्या नवजात बाळाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर नातेवाईकांनी संताप व्यक्त करत डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच महिला आणि बाळाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. मृत महिलेचे नाव रूपाली सोमनाथ इंदलकर (37) रा. कुसगाव बुद्रुक, ता. मावळ असे आहे. प्रसूतीसाठी त्यांना मायमर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान महिला आणि तिच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करत, मायमर हॉस्पिटलविरोधात गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. दरम्यान, महिला आणि नवजात बाळाचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, उपचारादरम्यान काही वैद्यकीय त्रुटी झाल्या होत्या का, तसेच या प्रकरणात नेमकी कोणाची जबाबदारी आहे, हे चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.

Exit mobile version