अपघातात महिलेचा मृत्यू

| पनवेल | वार्ताहर |

वाहनाने धडक दिल्याने अनोळखी महिलेचा मृत्यू झालाअसून याप्रकारणी खारघर पोलीस ठाण्यात वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 11 फेब्रुवारी रोजी खारघर स्काय वॉकच्या बस स्टॉप समोरील रस्त्यावर मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर पोलिसांना गर्दी आणि ट्रॅफिक दिसून आली. यावेळी पाहिले असता एका अनोळखी 45 वर्षीय महिलेचा मृतदेह पडलेला दिसून आला. यावेळी जाणाऱ्या वाहनाने या महिलेला धडक देऊन तिचा अपघात केला. त्यानंतर अपघाताची माहिती पोलिसांना न देता व महिलेला कोणतेही मदत न करता अपघात स्थळावरून पळून गेला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version