| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान मध्ये पर्यटनासाठी आलेल्या महिला पर्यटक प्रीती पाटील देसाई घोड्यावरून सैर करीत असताना घोड्यावरून पडून त्या जखमी झाल्या. या बाबत माथेरान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मागे एका पर्यटक तरुणाचा घोड्यावरून पडून अपघात झाला होता आणि नंतर त्याचा मृत्यू देखील झाला होता.
महिंद्रा कंपनीमध्ये नोकरी करणारे अभिषेक देसाई आणि प्रीती पाटील देसाई हे दाम्पत्य माथेरान येथे 6 फेब्रुवारी रोजी पर्यटनासाठी आले होते. त्यांनी दुपारी बाजारपेठ येथून मधील सात पॉईंट सर्कल राईड साठी दोन घोडे बुक करून माध्यमातून साडे बारा वाजता प्रवास सुरु केला. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हे दाम्पत्य ब्राइटलँड हॉटेलच्या आसपास माथेरान बाजारपेठ येथे परत येत असताना अश्वपाल विलास चव्हाण याने आपल्या हातातील घोड्याची लगाम सोडली. त्याआधी दोन तास देसाई यांना सुखरूप प्रवास घडविणारे यांची लगाम सुटल्याने प्रीती पाटील देसाई प्रवास करीत असलेला घोड्याने धूम ठोकली आणि तो पळू लागला. प्रीती पाटील देसाई या तोल जाऊन खाली जमिनीवर कोसळल्या. त्यावेळी त्यांच्या डोक्याला, हाताला, तोंडास गंभीर जखमा झाल्या.
जखमी अवस्थेत प्रीती देसाई पाटील यांना उपचारासाठी ठाणे येथील लेक सिटी हॉस्पिटल मध्ये दाखल केले.आपल्या घोड्याची लगाम सोडून देणारा अश्वपाल याच्यावर निष्काळजीपणाने आणि हयगयीने घोडा मोकळा सोडला आणि त्यामुळे पर्यटक महिलेला गंभीर दुखापत झाली. त्याबाबत माथेरान पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला. अधिक तपास सहायक फौजदर केतन सांगळे हे प्रभारी पोलीस अधिकारी शेखर लव्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.