घरावर झाड कोसळल्याने महिला जखमी

| नेरळ | प्रतिनिधी |

मोरेवाडीतील घरावर झाड कोसळले असून, या अपघातात त्या घरातील आदिवासी वृद्ध महिला जखमी झाली आहे. स्थानिकांनी प्रसंगावधान दाखवून मंजुळा केवारी यांना तत्काळ रुग्णालयात नेले आणि त्यामुळे त्यांच्यावर वेळेवर उपचार होऊ शकले.

कर्जत तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायत हद्दीतील मोरेवाडी या आदिवासी वस्तीमध्ये जोरदार वाऱ्यामुळे मंजुळा नावजी केवारी या वृद्ध महिलेच्या घरावर झाड कोसळल्याची घटना घडली आहे. घराचे आणि घरातील वस्तूंचे मोठे नुकसान झाले असून, मंजुळा केवारी या महिलेस गंभीर दुखापत झाली आहे. सुदैवाने झाड पडले त्या खोलीमध्ये घरातील कोणीही व्यक्ती नव्हती  त्यामुळे मोठा अनर्थ टळला. स्थानिकांनी तातडीने मदत केली असून, कर्जत तहसील कार्यालयाकडून त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version